Latur city लातूर शहरातील रस्त्यांच्या दुभाजक स्वच्छतेसाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचा अभिनव उपक्रम

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरात हिरवी गार झाडे दिसत आहेत त्याचे सर्व श्रेय ग्रीन लातूर वृक्ष टीम मुळे आहे हे नवीन सांगायची गरज नाही. डॉ. पवन लड्डा आणि त्यांच्या टिमच्या अविरत चालू असलेल्या अभिनव उपक्रमामुळे लातूर शहरात हे चित्र दिसत आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीम झाडे लावून त्यांचे संगोपन ही करते

आणि वर्षातून दोन वेळेस शहरातील रस्त्यांच्या दुभाजक स्वच्छ करत असतात. स्वच्छतेसाठी महाश्रमदान ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम पहिल्या दिवशी ( दि.18 ऑगस्ट ) व्यंकटेश आय हॉस्पिटल,जटाळ हॉस्पिटल, मुक्ताई मंगल कार्यालय, पडिले कॉम्प्लेक्स समोरील, अंबाजोगाई रस्त्यावरील दुभाजकाची ग्रीन लातूर वृक्ष

टीमच्या सदस्यांनी स्वच्छता केली. आणि दुसऱ्या दिवशी ( दि.19 ऑगस्ट ) अंबाजोगाई रस्ता वरील पडिले कॉम्प्लेक्स समोरील दुभाजक ते एस. टी. वर्क शॉप समोरील दुभाजकाची ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी स्वच्छता केली. या मध्ये दीड ट्रेकटर गवत, केरकचरा, दारूच्या बाटल्या, भंगार साहित्य बाहेर काढले, मागील

चार वर्षापासून ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून वर्षातून दोनदा शहरातील दुभाजक स्वच्छ करण्यात येतात. यावेळी झाडांना आळे करून झाडांच्या छाटण्या करण्यात आल्या. कार्य प्रचंड होते, प्रचंड श्रम घेत त्या घाण, केरकचर्यात गुडघाभर ऊंचीच्या वाढलेल्या गवतात उभे राहून सकाळी सहा पासून आठ पर्यत श्रमदान सुरू

होते. प्रशासनाला याची जाणीवही नसेल तरीही कुठलीही अपेक्षा न ठेवता ही अशी छोटी छोटी माणसे हे लातूर सुंदर करण्यासाठी दररोज झटत आहेत. या महाश्रमदानात आलेल्या व्यवसायाने डॉक्टर, वकील, शेतकरी, दुकानदार, विद्यार्थी, बँक अधिकारी, व्यवसायीक, नोकरदार अधिकारी, फोटोग्राफर असलेल्या डॉ.पवन लड्डा, वैशाली

यादव, दयाराम सुडे, नागसेन कांबळे, सुलेखा कारेपूरकर, राहुल माने, सिताराम कंजे, बळीराम दगडे, आदित्य स्वामी, प्रवीण भराटे, ओंकार, गणेश सुरवसे, शुभम आवड या सर्व सदस्यांनी स्वच्छ लातूर, सुन्दर लातूर, हरित लातूर करिता परिश्रम घेत अविरत कार्याचा 1540 वा दिवस पूर्ण केला. परिसरातील नागरिकांनी दुभाजकात कचरा न टाकता घंटा गाडी मध्ये कचरा टाकावा असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने दयाराम सुडे यांनी केले आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे