2023 चा “राष्ट्रीय बेस्ट लिडर अवार्ड” लातूरचे मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील गायकवाड यांना मिळणार

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – द ग्लोबल एच आर एफ अवार्ड्स 2023 ह्यूमन राइट फाउंडेशन भोपाळ मध्यप्रदेश यांच्या कडून दिला जाणारा 2023 चा राष्ट्रीय बेस्ट लिडर अवार्ड लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना जाहीर झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सम्मान सोहळा

मध्यप्रदेश मधे भोपाळ येथे होणार आहे. 2014 ते 2019 या कालावधी मध्ये लातूर लोकसभेचे अत्यंत प्रभावी पणे लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले प्रो. डॉ. सुनील गायकवाड यांनी केलेली विकास कामे आणि उत्कृष्ट नेतृत्व याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक राष्ट्रीय अंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानी केलेली ठळक

कामे लातूर साठी रेल्वे बोगी कारखान्याची सुरुवात, पासपोर्ट कार्यालय, सूपर स्पेशिलिटी हॉस्पिटल,पोस्ट चे विभागीय कार्यालय, रेल्वे स्टेशन वर हिंदी ची लाइब्रेरी,स्टेशन वर व्हीआयपी लाउंज, नवीन प्लेटफॉर्म,एक रेल्वे धावायची त्यांच्या कार्यकाळात 21 नवीन ट्रेन सुरु केल्या, पंढरपूर च्या आषाढी आणि कार्तिकी साठी स्पेशल ट्रेन फक्त 100

रुपयात सुरू केले,तिरुपती ला ट्रेन सुरू केली,विशेष म्हणजे मेडिकल ला जाण्यासाठी ची नीट परिक्षा केंद्र लातूर, नांदेड ,हिंगोली ला सुरू केले हजारों विद्यार्थ्यांची त्यामुळे सोय झाली.संसदे मध्ये लातूर मतदार संघातील अनेक विषय झिरो आवर मधे मांडले आणि अनेक प्रश्न देश पातळीवरील जवळपास 750 प्रश्न लोकसभेत

मांडले.भारतीय संसदीय समूह चा आजीवन सभासद म्हणून काम करताना भारत सरकार च्या वतीने वर्ल्ड ई पार्लियमेंट च्या कॉन्फरन्स साठी साउथ अमेरिका चिली इथे भारतीय शिष्टमंडल चा चेअरमन म्हणून भारताची अत्यंत चांगली भूमिका 160 देशाच्या प्रतिनिधी समोर जगासमोर प्रभावी पणे मांडली.,भूतान च्या एशियन कंट्री

च्या 21 देशाच्या सामाजिक संमेलनात भारतीय शिष्ट मंडळ चा चेअरमन म्हणून भारत सरकार ची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली.तेथे चांगल्या कामगिरी बद्दल भूतान सरकार कडून द हैप्पीनेस हा ग्रंथ देऊन डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा सभापती नी भूतान येथे सत्कार केला होता. दोन वेळा भारत सरकार चे परदेशात केले

होते. अशा अनेक कामाची दखल घेऊन ह्यूमन राइट फाउंडेशन भोपाळ मध्यप्रदेश च्या वतीने राष्ट्रीय बेस्ट लिडर अवार्ड घोषित केला आहे त्याबद्दल मा खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

Recent Posts