महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – आयपीएल क्रिकेटवर ( IPL cricket ) ऑनलाईन बेटींग (सट्टा) घेणाऱ्यावर अहमदपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी दि 24 मे बुधवार रोजी संध्याकाळी अहमदपूर व चाकूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वात पोलिसांनी छापा मारून 5 लाख 68 हजार
रुपये किंमतीच्या मुद्देमालासह 6 व्यक्तींना अटक करण्यात आली. IPS निकेतन कदम यांची एक कर्तव्यदक्ष आणि कडक पोलीस अधिकारी अशी ओळख त्यांच्या कार्यातून निर्माण झाली आहे. चाकूर व अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वात अहमदपूर, चाकूर आणि
रेणापूर भागात गुटखा, जुगार, मटका आणि अवैध्य दारू विक्री या सर्वावर कडक कारवाया केल्या आहेत. या कारवायाचे नागरिकांनी स्वागत आणि कौतुक केले आहे. निकेतन कदम यांच्या नेतृत्वात अहमदपूर शहरात अशीच एक कारवाई करण्यात आली आहे. चाकूर व अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस
अधीक्षक निकेतन कदम हे अहमदपूर उपविभागातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, अहमदपूर शहरामध्ये काही व्यक्ती मोबाईल फोनवर ऑनलाईन साईटवर आयपीएल क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावून सट्टा खेळत आणि खेळवित आहेत .या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक
निकेतन कदम यांनी त्यांच्या पथकातील तसेच अहमदपूर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अमलदारांची वेगवेगळी तीन पथके नेमून मिळालेल्या माहीतीनुसार खात्री करुन पथकातल्या पोलिसांनी अहमदपूर शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी एकाच वेळी छापा मारला तेव्हा 1) राधाकिशन उर्फ बाळू बालाजी वरंगलवाड, वय 32 वर्ष,
राहणार शिरूरताजबंद, तालुका अहमदपूर. 2) अंतेश्वर पांडुरंग भताने, वय 20 वर्ष, राहणार भतानेवाडी, तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. 3) सुंदरलाल कलु राऊतरे, वय 35 वर्ष, राहणार गवळी गल्ली, अहमदपूर. 4) शुभम कळू राऊतरे, वय 24 वर्ष, राहणार गवळी गल्ली, अहमदपूर. 5) धरम भीम लाल काबलिया, वय 25 वर्ष, राहणार
गवळी गल्ली, अहमदपूर. 6) नीलकांत गोपाल काबलिया, वय 34 वर्ष, राहणार महात्मा फुले विद्यालय रोडच्या बाजूला, अहमदपूर. हे व्यक्ती मोबाईल फोनवर क्रिकेटवर सट्टा खेळताना सापडले आणि पोलीस पथकाची खात्री होताच त्या वेक्तींना जागीच पकडले, पकडलेल्या आरोपीच्या मोबाईलची पहाणी केली असता त्याचे
मोबाईल फोनमध्ये ( IPL cricket ) आयपीएल किकेट मॅचवर सट्टा लावून खेळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल फोनसह ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपिंची झडती घेता त्याचे झडतीत क्रिकेट सट्याचे साहित्य, विविध कंपन्याचे अनेक मोबाईल,रोख रक्कम असा एकूण 5 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला. सट्टा खेळणाऱ्या आरोपीमधून 1) बाळू राजे, राहणार चौढा नगर अहमदपूर. 2) नवनाथ वैजनाथ फड, राहणार धर्मापुरी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. 3) लखन यादव, राहणार गंगाखेड जिल्हा परभणी हे तिन आरोपी फरार झाला आहेत आणि पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत. पुढील कायदेशीर कार्यवाही अहमदपूर
पोलीस स्टेशन करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अहमदपूर व चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात उपविभागीय कार्यालयाचे पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच अहमदपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बंकवाड व पोलीस अंमलदारांनी केली आहे.