महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील मौजे भिसे वाघोली आणि धनेगाव येथे रविवारी बाजार समितीच्या मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा
मेळावा झाला. यावेळी राजेश कराड बोलत होते दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट गोविंद नरहरे, हनुमंतबापू नागटिळक, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, संतोष बेंबडे, बाबू खंदाडे, संतोष शिंदे, बापूराव
चामले, श्याम वाघमारे, सुरज शिंदे, संभाजी वायाळ, विजयकुमार मलवाडे, व्यंकटराव जटाळ, विश्वास कावळे, लक्ष्मण नागिमे, संजय ठाकूर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. भाजपा नेते राजेश कराड यांनी अभ्यासू आणि आक्रमक विचार मांडले विरोधात जाणाऱ्यांना अडवण्याचे आणि जिरवण्याचे काम देशमुखांकडून
आजपर्यंत झाले. आता जनतेची सहनशिलता संपली असून हुकूमशाही, एकाधिकारशाहीचा अंत करण्यासाठी बाजार समितीच्या मतदारांनीच पुढाकार घेतला असल्याने लातूरातील हुकूमशाही संपवण्याची ही सुरुवात आहे. येत्या काळात प्रत्येक निवडणुकीत देशमुखांना पराभवच पत्करावा लागेल. 35-40 वर्षापासून बाजार समितीची
सत्ता उपभोगूनही सत्ताधारी देशमुख यांना चार पानाचा जाहीरनामा घेऊन मतदारासमोर जावे लागते यातच त्यांचा खऱ्या अर्थाने पराभव आहे असे सांगून राजेश कराड म्हणाले की, 40 वर्षात काहीच करू शकले नाही येणाऱ्या पाच वर्षात काय करतील असा प्रश्न उपस्थित करून बाजार समितीच्या माध्यमातून आजपर्यंत कोणत्याही
शेतकऱ्याचे आडते आणि व्यापाऱ्याचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देऊन कपबशी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून बहुमताने विजयी करावे असेही
आव्हान भाजपा नेते राजेश कराड यांनी केले. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. या मेळाव्यास भैरवनाथ पिसाळ, बाळासाहेब कदम, रुपेश थोरमोठे, प्रताप पाटील, उमेश बेद्रे, विलास कदम, सुधाकर गवळी, योगीराज साखरे, बाबासाहेब भिसे, गोपाळ पाटील,
काशिनाथ ढगे, महेश कणसे, अशोक सावंत, धनराज शिंदे, रशीद पठाण, बाबुराव खंदारे, शरद शिंदे, रवींद्र नाडे, समाधान अडगळे, बालाजी दुटाळ, अमर गायकवाड, दिलीप पेदाले, ऋषिकेश मस्के, मारुती शिंदे, वैजनाथ हराळे, धनंजय जाधव, विनायक मगर, काशिनाथ बडगिरे, चंद्रकांत वांगस्कर संजू सवयी
योगीराज साखरे, रशीद पठाण, दीपक वांगस्कर, सुरेश पाटील, शरद शिंदे, ईश्वर बुलबुले, समाधान कदम, वैजनाथ लवटे, बालाजी मुळे, गोविंद नांदे, शुभम खोसे , अण्णासाहेब कदम, अशोक कदम, बापूराव बिडवे, सचिन हिंगे, तानाजी ढोबळे, बापूराव देवकर, गोपाळ खोसे, सुखदेव भरडे, राजाराम पडवळे, विष्णू कसबे, नामदेव
मांडे, प्रशांत हिरे, महेश साखरे, वैभव मगर, सुफी सय्यद, बालाजी गवळी यांच्यासह बाजार समितीचे मतदार बंधू भगिनी भाजपाचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.