महाराष्ट्र खाकी ( पुणे / प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरव केलेले लातूरचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम विभागा चे माजी सचिव तथा एमएसआरडीसी ( बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ) चे तांत्रिक प्रमुख सह-व्यवस्थापकीय महासंचालक, ज्यांच्या कार्यकुशतेने अदभुत असे ऐतेहासिक काम झाले आहे असे
अभियंता अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना भरतातील शेकडो साधू महंत संत यांच्या उपस्थित गोवा येथील महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान आणि स्वर्गीय विजयाताई नाईक फाऊंडेशन गोवा यांच्या वतीनी अत्यंत मानाचा असा पुरस्कार जीवन गौरव केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या आणि महामंडळेश्वर महाराज यांच्या
हस्ते देउन भव्य अशा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
उत्कृष्ट अभियंता अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनी त्यांच्या शासकीय नोकरीच्या काळात अनेक अवघड प्रकल्प पुर्ण केले आहेत. देशातील उत्कुष्ट इमारत दिल्ली येथील महाराष्ट्र सदन , मुंबई चे ऐतेहासिक उच्च न्यायालयाची इमारत दुरुस्थी, हाईमाउंट बिल्डिंग, पैनगंगा
नदीवरील सर्वात उंच लोखंडी पूल,मुंबई शहरातील सर्व उड्डाण पुले, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, कोस्टल रोड, मुंबई सी लिंक रोड, समृद्धी महामार्ग, आणि महाराष्ट्रातील एमएसआरडीसी ने बनवलेले सर्व महामार्ग, अशी प्रचंड अवघड कामे यशस्वी पुर्ण करणारे इंजिनीअर अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना देशातील विविध राज्यातून
आलेल्या महामंडलेश्वर साधू संत यांच्या उपस्थितीत जीवन गौरव पुरस्कार देउन सन्म्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा सत्कार करताना अत्यंत कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. लातूर चे माजी खासदार प्रो. डॉ. सुनील ब
गायकवाड, माजी अधिक्षक अभियंता रमेश आगवणे, माजी मुख्य अभियंता व्ही के पवार,कार्यकारी अभियंता पाटील,पत्रकार रमेश जाधव,पत्रकार वळसे पाटील, संपादक प्रा रामेश्वर बद्दर, आर पी आय ( खरात) चे प्रदेश अध्यक्ष दयानंद कांबळे, पत्रकार सारंग वाघमारे, आदि उपस्थित होते.