खरोसा लेणी, देवी हल्लाळी, गोपाळपूर, देवताळा व निळकंठेश्वर तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा – आमदार अभिमन्यू पवार

महाराष्ट्र खाकी ( मुबंई / विवेक जगताप ) – औसा मतदारसंघातील जनतेने अभिमन्यू पवार यांना आमदार म्हणून निवडून दिल्यापासून अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांनी राबवलेला शेत रस्त्याचा औसा पॅटर्न राज्यभारत गाजत आहे. सध्या

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे , या अधिवेशनात आमदार अभिमन्यू पवार यांनी खरोसा लेणी, देवी हल्लाळी, गोपाळपूर, देवताळा व निळकंठेश्वर तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. सध्या राज्य सरकार केवळ अ आणि ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी

निधी उपलब्ध करून देते तर क दर्जाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन निधीतून निधी मिळतो. जिल्हा नियोजन निधीतून तुटपुंजा निधी मिळत असल्याने क दर्जाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाला खीळ बसत असल्याची भूमिका आमदार पवार यांनी सभागृहात मांडून अ आणि ब प्रमाणेच क दर्जाच्या तीर्थक्षेत्रांच्या

विकासासाठी सुद्धा राज्य सरकारने थेट निधी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा तसेच औसा मतदारसंघातील खरोसा लेणी, देवी हल्लाळी, गोपाळपूर, देवताळा व निळकंठेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.

Recent Posts