पोलीस

लातूर पोलिसांच्या उत्कृष्ठ तपासामुळे विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी रहीमला 3 वर्षाची शिक्षा

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नळेगाव दूरक्षेत्र येथील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांच्या कार्याचे कौतुक कोरोना काळात झाले होते. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीला घरी सोडून दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत कडा पहारा देत होत्या . अशा कर्तबगार

पोलिस अधिकाऱ्यामुळेच सामान्य नागरिक सुरक्षित असल्याच्या भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करीत होते. याच कर्तव्यदक्ष तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात उत्कृष्ट तपास करून आरोपीस न्यायालया समोर पुरावे देऊन तिन वर्षाचा करावस घडवला असे म्हणले तर चुकीचं होऊ नये. दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी चाकूर पोलीस स्टेशन हद्दीतील

नळेगाव येथील एका अल्पवयीन पीडित मुलीचा विनयभंग केल्याच्या घटनेवरून चाकूर पोलीस स्टेशन येथे  रहीम इब्राहिम तांबोळी, (शेख) वय 38 वर्ष, धंदा मजुरी, राहणार नळेगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. याच्या विरुद्ध गुन्हा FIR NO. 438/2020 कलम 354,(A) 452,506 भादवी व 7, 8, 9(क), 10 लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात

आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी तात्काळ  आरोपी रहीम इब्राहिम तांबोळीला अटक केली होती. गुन्ह्याच्या अनुषंगाने पंचनामा, प्रत्यक्ष साक्षीदार व इतर भौतिक पुराव्यांची जोडणी करून, भक्कम पुरावे गोळा करून आरोपी रहीम इब्राहिम तांबोळी विरुद्ध मा. न्यायालयात

दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यावरून अतिरिक्त न्यायाधीश, लातूर बी.सी.कांबळे यांनी  गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी मिळवलेले व दोषारोपत्रा सोबत जोडलेले पस्थितीजन्य, भौतिक व भक्कम पुरावे तसेच तपास अधिकारी, पंच, प्रत्यक्ष साक्षीदार, यांच्या महत्त्वाच्या  साक्षी वरून दिनांक 21/11/ 2022 रोजी नमूद आरोपीस तीन वर्ष कारावास व एक हजार रुपयांच्या

दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तत्कालीन तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा तपास करून, मुदतीत तपास करून भक्कम पुरावे जमा करून मा.न्यायालयात हजर केल्याने तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी केलेल्या युक्तिवादावरून मा.न्यायालयाने आरोपी रहीम इब्राहिम तांबोळीला शिक्षा सुनावली आहे.

या गुन्ह्यात चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते , कोर्ट ट्रायल मॉनिटरिंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड, कोर्ट पैरवी अमलदार चंद्रकांत राचमाले यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

Most Popular

To Top