प्रेरणा होनराव यांच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती अर्ज मोफत नोंदणी करून मिळणार

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा भाजपाच्या नेत्या भाजपा युवा मोर्च्याच्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांनी पोलीस भरती साठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ् मंडळीच्या मार्फत मोफत पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी केंद्र चालू करणार आहेत अशी घोषणा प्रेरणा होनराव यांनी केली आहे. प्रेरणा होनराव यांनी याआधीहि असे नवनवीन समाज उपयोगी

उपक्रम राबवले आहेत. प्रेरणा होनराव यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत आणि कौतुक होत आहे. आणि पोलीस भरती साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत. राज्यामध्ये जवळपास 22 हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. मात्र पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सर्वर

डाऊनचा फटका बसत होता. महाराष्ट्रातून राज्य सरकारला अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते यांनी निवेदने देऊन पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती या मागणीची दाखल घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेतली आहे. पोलीस भरतीचे अर्ज सादर करण्यास आता 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

 

Recent Posts