महाराष्ट्र

शिवतीर्थवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी लातूर मधून रेल्वेची वेवस्था

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – शिवसेनेच्या 40 आमदारांनी गद्दारी करून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करून सरकार पडले आणि भाजपा सोबत सरकार स्थापना केले. तेव्हा पासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद होत आहेत. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थवर दसऱ्याच्या दिवशी विचाराचे सोने लुटण्यासाठी राज्यातील प्रत्येक

शिवसैनिकाच्या मनामध्ये शिवतीर्थवर जाण्याची इच्छा आहे त्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उद्या मुंबईला जाणार आहेत. लातूर जिल्हा शिवसेना माजी प्रमुख पप्पू भाई कुलकर्णी आणि महानगर प्रमुख विष्णूपंत साठे यांनी उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेना प्रेमी आणि शिवसैनिकासाठी रेल्वेची वेवस्था केली आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पप्पू भाई कुलकर्णी यांनी ”

शिवतीर्थावर दसरा मेळावा बीकेसीवर कचरा मेळावा ” अशी पोस्ट करत शिंदे कटाच्या मेळाव्यावर निशाणा साधला आहे. लातूर जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी पप्पू भाई कुलकर्णी यांचे खूप मोठे योगदान आहे. शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या या कठीण काळात पप्पू भाई कुलकर्णी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख पदी पुन्हा पप्पू भाई

कुलकर्णी यांची नियुक्ती करावी अशी लातूरच्या शिवसैनिकांची मागणी आहे ! ज्यांना दसरा मेळाव्यासाठी यायचे आहे त्यांनी आपले नाव उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे व शहर प्रमुख किसन समुद्र यांच्याकडे नोंदवावे कृपया आपण त्याचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती पप्पू भाई कुलकर्णी आणि विष्णुपंत साठे यांनी केली आहे.

Most Popular

To Top