महाराष्ट्र

P V राव सरांनी गुणवंत विद्यार्थ्यांची D J लावून मिरवणूक कडून केला सत्कार आणि गौरव

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – राज्यात शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न निर्माण करण्यात मोलाचा वाटा असलेल्या पी व्ही सरांच्या संकल्प अकॅडमीने सर्वात चांगला निकाल दिला आहे. NEET -2022 मध्ये 600 मार्कच्या वर मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले 250 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. हे यश पी व्ही सरांच्या टिमचे आणि

विशेषता दिवस रात्र मेहनत घेऊन आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आहे. दि 12 सप्टेंबर वार सोमवार रोजी पी व्ही सरांच्या संकल्प अकॅडमीच्या वतीने या चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा डिजे लावून ट्युशन ऐरियात मिरवणूक काडून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. या वेळी पी व्ही सर बोलताना म्हणाले की हे यश हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे

आहे. आणि संकल्प अकॅडमीच्या सर्व शिक्षक मंडळींचे आहे. या विद्यार्थ्यांनी मोठे डॉक्टर होऊन देशाची आणि समाजाची सेवा करावी आणि भविष्यात कधी भेट झालीतर संकल्प अकॅडमीची आठवण ठेवावी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि पी व्ही सरांनी विद्यार्थ्यांचे या दैदीप्यमान यश प्राप्तीसाठी कौतुक केले.

Most Popular

To Top