महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर शहरातील MIDC पोलीस स्टेशन हद्दीत लातूर MIDC भाग आणि काही नगरी वस्ती चा समावेश आहे. MIDC पोलीस स्टेशन चा कारभार पोलीस निरीक्षक संजीवन मिरकिले यांच्याकडे आल्यापासून पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीचे प्रमाण चांगले कमी झाले होते. पण आता असे म्हणता येणार नाही त्याला करनेही तशी आहेत. लातूर
शहरातील एक नंबर चौकातील साई अपार्टमेंटमध्ये घरी कोणी नसल्याचा फायदा उठवत चोरांनी दरवाजाचे कुलूप तोडून 1 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी बुधवारी MIDC पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा नाेंद आहे.पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नारायण अंबेकर यांचा मुलगा मावशीकडे जेवण करण्यासाठी मंगळवारी रात्री 9.30 वाजता गेला होता. तो
रात्री उशिरा घरी परत आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. चोरांनी कपाटाचे कुलूप तोडून रोख 50 हजार, कानातील झुमके, पोत, मंगळसुत्र, अंगठी, पिंपळपान, बाली असा एकूण 1 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी फिर्यादी नारायण गंगाधर अंबेकर यांच्या तक्रारीवरुन MIDC पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कराड करीत आहेत.