पोलीस

Latur police news लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासली जावी तसेच त्यांच्यातील कलागुणांचा विकास व्हावा या संकल्पनेतून लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा गुरुवारी (दि. 25)

बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेसाठी पोलीस मुख्यालय, चाकूर उपविभाग, अहमदपूर उपविभाग, निलंगा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनचे पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सदाशिव शिंदे हे होते. पोलीस उपअधीक्षक (ग्रह) अंगद

सुडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात उपप्राचार्य डॉ.सदाशिव शिंदे यांनी “ताणतणावमुक्त जीवनशैलीसाठी खेळांची आवड जोपासली पाहिजे, प्रत्येक पोलीस अमलदार हा समाजाचा लीडर आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे कर्तव्य खिलाडी वृतीने आव्हान स्वीकारून पार पाडावे.आज खाजगी /कार्पोरेट क्षेत्राततील व्यक्ती पेक्षा युनिफॉर्म सर्विस मध्ये

असणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची समाजाप्रती मोठी जबाबदारी असल्याने प्रत्येक युनिफॉर्म मधील अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाही, शाशनाप्रती, जनतेप्रती एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडावे” असे सांगितले. पोलीस मुख्यालय मैदानावर तीन दिवसात फूटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कब्बडी तसेच 100, 200, 400 व 800 मिटर धावणे,

गोळाफेक, लांबउडी, भाला फेक, थाळी फेक, तायक्वांदो आदी स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी (दि.25) उर्वरित स्पर्धा घेऊन त्यानंतर समारोप कार्यक्रम घेण्यात आला.संगीत खुर्चीमध्ये महिला पोलीस आमलदार एस. शिंदे व ज्योती पवार यांनी अनक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवला.तर 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेत महिला पोलीस अंमलदार क्रांती आदमाने व अफसाना शेख यांनी अनुक्रमे प्रथम,

द्वितीय बक्षीस मिळवले. पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 100 मिटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये श्रीहरी डावरगावे यांनी प्रथम व प्रेमानंद कांबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. या क्रीडा स्पर्धेत चाकूर अहमदपूर निलंगा उपविभाग व पोलीस मुख्यालय अशा एकूण चार विभागांचे संघ सहभागी होते. पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद

पटकावले.उत्कृष्ठ महिला खेळाडू व पुरुष खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच पोलीस उपनिरीक्षक महेबूब गलेकाटू यांना नुकतेच राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याने प्रमुख पाहुण्याचे हस्ते त्यांचाही शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी स्थानीक गुन्हे शाखेचे (LCB)पोलीस निरीक्षक

गजानन भातलवंडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार बिर्ला, पोलीस निरीक्षक अशोक बेले, प्रेमप्रकाश माकोडे, दिलीप डोलारे, संजीवन मिरकले ,पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, शिवाजीनगर चे सपोनी दयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, मेहेबूब गल्लेकाटू यांची उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी

राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार, राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने, पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोकरे ,क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे ,युसुफअली धावडे ,प्रशांत स्वामी अन्वर शेख, प्रशिक्षक भारती, सय्यद, गजगे ,अंकलकोटे, गडेराव यांनी परिश्रम घेतले. क्रीडा स्पर्धा पारदर्शक पार पडण्याकरिता इतर विभागातील वीरभद्र स्वामी सर, नागरगोजे सर, रियाज शेख, जुनेद

शेख सर यांनी पंचाची भूमिका पार पाडली. क्रीडा स्पर्धाचे संपूर्ण छायाचित्र पोलीस अमलदार रियाज सौदागर व सुहास जाधव यांनी केले. बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केलेल्या सदर क्रीडा स्पर्धेस खेळाडू, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

To Top