महाराष्ट्र

श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या भव्य रॅलीने लातूर शहर तिरंगामय

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर येथील लातूर पॅटर्नचा चेहरा असणारे प्रा. उमाकांत होनराव यांच्या श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या व रिलायन्स लातूर पॅटर्न च्या वतीने सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. हि भव्य रॅली श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान

महाविद्यालय अंबाजोगाई रोड ते राजीव गांधी चौकापर्यंत
आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या व रिलायन्स लातूर पॅटर्न शिक्षण संस्था उत्तम शिक्षणासोबत उत्तम संस्कार आणि देश भक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे कार्य प्रभावीपणे करत

असते. या भव्य रॅलीचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.उमाकांत सरांच्या मार्गदर्शनात केले. प्रा, ओमकार होनराव, प्रेरणा होनराव यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. ही रॅली यशस्वी होण्यासाठी सर्वांनी परिश्रमाने व उत्साहाने उत्तम आयोजन केले. रॅलीमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला.

Most Popular

To Top