लातूर जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळत नाहीत तो पर्यंत अमित देशमूखच पालकमंत्री – मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – महाराष्ट्रात सत्तानंतर झाले दिड महिन्यानंतर मंत्रिमंडळही झाले.पण राज्यातील जिल्ह्याना आणखीन पालकमंत्री मिळाले नाहीत. पण लातूर वागळता! लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी एका कार्यक्रमात लातूर ZP चे माजी उपाध्यक्ष राम तिरुके यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की लातूर जिल्ह्याला जो पर्यंत नवीन पालकमंत्री

मिळत नाही तो पर्यंत अमित देशमुख हेच पालकमंत्री आहेत असे विक्रांत गोजमगुंडे म्हणाले. लातूर येथे 15 ऑगस्ट रोजी यलम मित्र परिवार तर्फे समाजातील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख,
माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर ZP माजी

उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रा. शिवराज मोटेगावकर, राष्टवादी लातूर माजी जिल्हा अध्यक्ष D.N शेळके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी इतर मान्यवर उपस्तित होते. राम तिरुके यांनी आपल्या भाषणात अमित देशमुख यांचा माजी पालकमंत्री म्हणून त्याच्या अडीच वर्षाच्या काळात केलेल्या राज्यातील आणि विशेषतः लातूर जिल्ह्यातील कार्याचे

विशेष कौतुक केले. नंतर माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या भाषणात रामभाऊ तिरुके यांच्या तिन गोष्टी बद्दल नाराज असल्याचे सांगून त्यातली ही एक गोष्ट होती. जो पर्यंत तुम्ही लातूरला नवीन पालकमंत्री देत नाहीत तो पर्यंत अमित देशमुखच पालकमंत्री आहेत आणि नवीन पालकमंत्री मिळाल्या नंतर अमित देशमुख माजी पालकमंत्री होतील असे म्हणताच सभागृहत एकच सर्वजण हसून टाळ्या वाजवल्या.

Recent Posts