महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – लातूरचे उच्चशिक्षित,संसद रत्न,लोकप्रिय माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन आणि कृष्णा चव्हाण फिल्म प्रोडक्शन मुंबई च्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा यावर्षीचा “राष्ट्रीय रत्न सन्मान अवॉर्ड 2022” जाहीर झाला आहे. प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना यापूर्वी संसद रत्न पुरस्काराने
आणि अनेक देश विदेशातील पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. सुनील गायकवाड हे 16 व्या लोकसभेतील उच्चशिक्षित खासदार म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झाले आहे. त्यांना बांगलादेश चा जागतिक शांती पुरस्कार, भारताचा बुद्धा शांती पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरव करण्यात आला आहे. सोळाव्या लोकसभेत खासदार म्हणून त्यांनी केलेली
कामगिरी ही अत्यंत लक्षणीय आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात अनेक केंद्र सरकारच्या योजना राबवण्याचे काम केलं आहे. प्रामुख्याने पासपोर्ट सेवा केंद्र, रेल्वे बोगी कारखाना,सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, पोस्टाचे विभागीय कार्यालय,विशेषतः विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा सेंटर, आणि जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे चे जाळे असे अनेक ठळक कामे सांगता येतील. लातूर येथील रेल्वे स्टेशन वरून
जवळपास 21 ट्रेन त्यांच्या काळात सुरू झाल्या होत्या,रेल्वे स्टेशन वरती सर्वात मोठे तिकीट सेंटर, हिंदी लायब्ररी, व्हीआयपी लॉंउंज ,असे उल्लेखनीय कार्य डॉक्टर सुनील गायकवाड यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात केले आहे. विशेषतः लातूरला पाण्याचा दुष्काळ होता तेव्हा लातूरला ट्रेननी पाणी देण्याचे काम ही त्यांच्या प्रयत्नाने झालं होतं.खासदार निधीतून लातूर शहरात 100
पाण्याच्या बोर देण्याचं काम ही लातूरच्या इतिहासातील पहिले खासदार हे ते एकमेव आहेत असे म्हणता येईल. स्थानिक विकासासाठी दिला जाणारा खासदार निधी हा संपूर्ण मतदारसंघात खर्च करणारे खासदार असेही नोंद त्यांच्या नावे आहे. अशा अनेक कार्याची दखल घेऊन कृष्णा चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्या संस्थेने 2022 चा मानाचा आणि प्रतिष्ठेचा राष्ट्रीय रत्न सन्मान हा पुरस्कार
देऊन 20 जुलै 2022 रोजी मुंबई जुहू येथील मेअर हॉल मध्ये गौरव करण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूड क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते,यांची उपस्थिती असणार आहे. प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्या अभिनंदन करण्यात येत आहे.