रेशनचे 350 गव्हाचे कट्टे आणि 376 तांदळाचे कट्टे असा 357 क्विंटल धान्य साठ्यांसाह तहसीलदारांनी देशमुखाचे गोदाम केले सिल

महाराष्ट्र खाकी ( नाशिक / विवेक जगताप ) – मागील काही दिवसापासून नाशिकमध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या मात्र, तक्रारीकडे जिल्हा पुरवठा अधिकारी कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच धान्य घोटाळा सुरू असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने रेशन माफियांची ही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास आणून

दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन ही कारवाई केली असून संबंधित संशयितास पोलीसांनी लाखो रूपयाच्या मुद्देमालासहीत ताब्यात घेतले आहे.नाशिक जवळील माडसांगवी येथील एका गोदामात 52 हजार क्‍विंटल धान्याचा साठा असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा साठा अनधिकृत असल्याची

तक्रार प्राप्त होताच नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी तात्काळ येथे दाखल होत पाहणी केली असता विनापरवाना त्याची साठवणूक केली असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आल्याचे स्पष्ट झाले.यामुळे संबंधित गोदाम तहसीलदार अनिल दौंडे यांनी सील केले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्याकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी

तक्रार केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले. तहसीलदार अनिल दौंडे यांनी तातडीने पथकासह माडसांगवी येथे गोदामावर छापा टाकत हा धान्यसाठा जप्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार नरसिंह ट्रेडिंग म्हणून देशमुख नामक व्यक्तीचे येथे गोदाम आहे. या गोदामात 175 क्विंटल गहू, 182 क्विंटल तांदूळ असा

357 क्विंटल धान्य साठा आढळून आला. हा धान्यसाठा कुठून आला? रेशन दुकानांशी काही संबंध आहे का? संबंधित व्यावसायिकाकडे परवाना आहे का? या सर्व बाबींची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात यापूर्वी अशा रीतीने धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे फहीम शेख, शहर अध्यक्ष ऋषिकेश वर्मा यांच्या

तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे तहसीलदार अनिल दौंड यांनी सांगितले. या धान्याच्या पोत्यांवर मध्य प्रदेश, महाराष्ट्र शासनाचा उल्लेख असून काही पोती रेशनची असल्याचेही निदर्शनास आले आहे. गोदामात 350 गव्हाचे कट्टे आणि 376 तांदळाचे कट्टे असा 357 क्विंटल धान्य साठा आढळला जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम 3 नुसार सदरच्या गोदामाला विरोधात तक्रार दाखल

करण्यात आली आहे त्यातील काही धान्याचे वर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारचा उल्लेख आढळून आला दरम्यान तपास सुरू असून त्यानंतर अधिक माहिती समोर येईल, अशी माहिती नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी सांगितले.

Recent Posts