महाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातील थेरगाव येथील जवान सुर्यकांत तेलंगे पठाणकोट येथे शहिद

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथील जवान सुर्यकांत शेषेराव तेलंगे हे कर्तव्य बजावत असताना पठाणकोट येथे शहिद झाले असल्याचा निरोप गावात मिळताच दि.27 रोजी गावकर्‍यांनी सर्व व्यवहार बंद ठेवला होता.शहिद सुर्यकांत तेलंगे यांचा पार्थिव दि.28 रोजी मंगळवारी दुपारी थेरगावात येईल,अशी माहिती गावकर्‍यांनी पोलिसांकडून

मिळाली असल्याचे सांगण्यात आले. जवान सुर्यकांत शेषेराव ते सैन्यदलात 7 वर्षांपुर्वी भरती झाली होती.ते एका शेतकरी कुटुंंबातून होते.त्यांच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.सुर्यकांत तेलंगे हे अत्यंत मुले असा परिवार आहे.सुर्यकांत तेलंगे हे अत्यंत मनमिळाऊ असे थेरगावचे सुपूञ होते.ते शहिद झाल्याचे कळताच थेरगाव

गावावर शोककळा पसरली आहे,अशी खंत गावातील प्रतिष्ठित नागरिक राजकुमार पाटील, धनंजय पाटील यांनी दिली आहे.शहिद जवान सुर्यकांत तेलंगे यांच्या पार्थिवावर गावामध्ये नेमके कोठे अंन्त्यसंस्कार करायचे हे महसूल प्रशासनाचे अधिकारी आल्यानंतर निश्चित करण्यात येईल,असेही सांगण्यात आले.थेरगाव येथील जवान सुर्यकांत तेलंगे शहिद जवान झाल्याची बातमी कळताच गाव, शिरूर अनंतपाळ व लातूर जिल्हाभरातील शहिद जवानास श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.

Most Popular

To Top