पोलीस

बोगस दवाखाने थाटून रुग्णांवर उपचार करणार्‍या तीन डॉक्टरांवर कारवाई

महाराष्ट्र खाकी (यवतमाळ / विवेक जगताप ) – यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा, कुर्ली, चिखलवर्धा येथे बोगस दवाखाने थाटून रुग्णांवर उपचार करणार्‍या तीन डॉक्टरांवर मंगळवार, 21 जून रोजी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी घाटंजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. अजित अरविंद विश्वास, शरद लक्ष्मण गंपावार, सम्राट सोपान अधिकारी

अशी गुन्हा नोंद केलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. यापैकी दोघांना ताब्यात घेतले असून, एक जण फरार आहे. काही वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात बोगस डॉक्टर चांगलेच सकि’य झाले आहेत. कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय शिक्षणाची नोंदणी न करणारे हे बोगस डॉक्टर ग्रामीण भागातील नागरिकांवर खुलेआम उपचार करत आहेत. या संदर्भात बर्‍याच वेळा तक्रारी होऊनही थेट

कारवाई फारशी करण्यात येत नाही. घाटंजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी पारवा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पुरम, अरुण खांडरे, अशोक खांडरे यांच्यासह पारवा पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सापळा रचून छापा टाकला. यात प्रामु’याने पारवा येथील विश्वास दवाखान्यावर धडक

मारली. यावेळी  बोगस डॉक्टर अजित विश्वास (वय 60, पारवा) हा आढळून आला. त्याच्याकडे वैद्यक व्यवसायाची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाही. 657 रुपयांची औषधे त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आली. कुर्ली येथील दवाखान्यात रुग्णावर उपचार सुरू होता. हा बोगस दवाखाना शरद गंपावार (वय 60, कुर्ली) याचा आहे. या ठिकाणी 699 रुपयांची औषधे आणि इतर वस्तू आढळून

आल्या. याच पथकाला चिखलवर्धा ते सावळी रस्त्यावरील एका शेडमध्ये दवाखान्याचा फलक लावलेला अवस्थेत दिसून आला. परंतु तो दवाखाना बंद होता. त्याच्या शेजारील सम्राट अधिकारी (वय 32, चिखलवर्धा) याच्या घराची झडती आशा वर्कर नीता कन्नाके यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. घराच्या स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात अंदाजे 32 हजार रुपयांच्या अ‍ॅलोपॅथी औषधी गोळ्या आढळून आल्या. हे तिघेही अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले

Most Popular

To Top