महाराष्ट्र

निलंगा तालुक्यातील निटूर येथील तुडूंब भरलेली नालीतील गाळ केव्हा काढणार प्रभाग दोनमधील जनतेचा टाहो..!

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालक्यातील निटूर येथील प्रभाग दोन मध्ये पावसाळ्यात सद्यस्थितीला बाजारचौकातील नाली तुडूंब भरलेली आहे तरी ग्रामपंचायत कार्यालय निटूर यांनी तात्काळ नाल्यातील गाळ काढून स्वच्छता करावी अशी मागणी प्रभागातील नागरिक व महिला करीत आहेत. प्रभाग दोनमधील रहिवाशी धोंडीराम नागभूजंगे यांचे घर आहे

पण सद्यस्थितीला पावसाळा सुरू झाल्याने त्यांच्या घरातील आतील भागात पाणी शिरत असल्याने घरात डासोत्त्पतीचे प्रमाण वाढत आहे.म्हणून नागरिक व महिलांना या तुडूंब नाल्या भरल्यामुळे काढणे आवश्यक आहे.याच पध्दतीने गावातील नाल्या तुडूंब अवस्थेत असल्याने त्यात गाळमिश्रित मोठ्या प्रमाणात असल्याने याचा ञास आरोग्यावर होताना दिसत आहे. एकंदर,

ग्रामपंचायत कार्यालय,निटूर यांनी तात्काळ नाल्यातील गाळ उपसा करून नाल्या क्लिन करून घ्याव्यात तसेच,धोंडीराम नागभूजंगे यांच्या घरातील पाणी थांबविणे आवश्यक आहे त्याचा परिणाम त्यांच्या घरातील नागरिकांना ञास सहन करावा लागत आहे म्हणून तात्काळ नाल्यातील गाळ काढून एक आदर्शवत निर्माण करावा ही मागणी प्रभागातील नागरिकांची आहे.

Most Popular

To Top