महाराष्ट्र कुस्ती महा-वीर 2022 किताबाचा मानकरी रामलिंग मुदगड येथील सागर बिराजदार ठरला

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – मल्ल सागर बिराजदार व रामेश्वरचे मल्ल भरत कराड यांच्यामध्ये महाराष्ट्र कुस्ती महा-वीर-२०२२ स्पर्धेची अंतिम फेरी चांगलीच रंगली. रंजकदार झालेल्या या स्पर्धेत अखेर बाजी मारत निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगडचे सागर बिराजदार यांनी महाराष्ट्र कुस्ती महा-वीर-२०२२ या खुल्या गटातील किताब व चांदीची गदा पटकावली. सागरने

अंतिम लढतीचा सामना १०-४ असा जिंकत जेतेपद पटकावले. तसेच त्याला ७१ हजार रुपये रोख, सुवर्णपदक, प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्मपूजक – दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा रामेश्वर (रूई), येथे संपन्न झाली. १४

वर्षापासून आयोजित या कुस्ती स्पर्धेत रामेश्वर येथील मल्ल भरत कराड यांनी उपविजेते पद मिळविले. रौप्यपदक, प्रशस्तीपत्रक व रोख रुपये ५१,०००/- चे पारितोषिक देण्यात आले. सातारा येथील राहुल सुळ याला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याला कांस्य पदक, प्रशस्तीपत्रक व रुपये ३१,०००/- रोख देण्यात आले. सर्व विजेत्या खेळाडूंना विश्वशांती केंद्र

(आळंदी), माईर्स एमआयटीचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास, आमदार रमेशअप्पा कराड, रामेश्वर येथील माजी सरपंच तुळशीराम दा. कराड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, प्रदेशचे अमोल पाटील, दत्ता पाटील, साहेबराव पवार, महाराष्ट्र केसरी संभाजीराव आजगावकर , महाराष्ट्र कुस्तीगीर

परिषदेचे विलास कथुरे उपस्थित होते.
इतर वजन गटातील विजेते पुढीलप्रमाणे(प्रथम क्रमांक – सुवर्णपदक, द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, तृतीय क्रमांक – कांस्यपदक व रोख रक्कम पुढे दिल्याप्रमाणे)

वजन गट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक

८६ किलो प्रथम- श्रीकृष्ण जाधव , द्वितीय- कालीचरण सोलणकर, तृतीय- रविराज चव्हाण
रक्कम रु. ३०,०००/- रु. २५,०००/- रु. २०,०००/-

७४ किलो प्रथम -नामदेव कोकाटे द्वितीय -विष्णू तातपुरे तृतीय -प्रकाश काळे
रक्कम रु. २५,०००/- रु. २०,०००/- रु. १५,०००/-

७० किलो प्रथम -देवानंद पवार द्वितीय- अभिजीत भोसले तृतीय- सुजित मदने
रक्कम रु. १५,०००/- रु. १०,०००/- रु. ७,०००/-

६५ किलो प्रथम – महेश तातपुरे, द्वितीय- सचिन बंडगर, तृतीय- विकास पिसाळ
रक्कम रु. १०,०००/- रु. ८,०००/- रु.५,०००/-

६१ किलो प्रथम – तुषार माने, द्वितीय- दयानंद सलगर, तृतीय- विवेक शेंडगे
रक्कम रु. ८,०००/- रु. ५,०००/- रु.३,०००/-

५७ किलो प्रथम -आकाश गडदे, द्वितीय- विशाल बरडे, तृतीय- मयूर फुलमाळी
रक्कम रु. ५,०००/- रु. ३,०००/- रु. २,०००/-

७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी झाले होते. त्यापैकी श्री.नंदू स्वामी व हरिराम खटावकर या पैलवानांचा योग महर्षी स्वातंत्र्यसेनानी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा स्मृती-सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, कुस्तीमुळे व्यक्तीचे मन व मनगट मजबूत होते. आज मराठवाड्यातील प्रत्येक गावा गावात मल्लांसाठी तालीम उभी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मल्ल विद्येचा प्रसार होईल. कुस्तीगीराकडे शक्ती व बुध्दी असतेच पण त्यांनी चारित्र्यावर विशेष भर दयावे.
बाबा निम्हण यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन व धावते वर्णन केले. प्रा.डॉ. पी.जी.धनवे यांनी आभार मानले.

Recent Posts