लातूर जिल्हा

निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील माळी समाज स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ !

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील मौजे रामलिंग मुदगड ता. निलंगा येथील लिंगायत माळी समाजाच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवुन दफ्तरी नोंद घेण्यासाठी दि. 25 जानेवारी 2022 रोजी निलंगा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार होते.पण प्रशासनाकडून वारंवार आम्हाला वेठीस धरण्यात येऊ नये,आपल्या मागण्यांची

सहानुभूतीपूर्वक विचार करुन तत्काळ कार्यवाही करु, पण आपण उपोषण करु नये असे सांगण्यात आल्याने, समाजबांधवांनी प्रशासनास वेठीस न धरता अत्यंत सन्मानपूर्वक उपोषण माघार घेतले होते.पण अद्याप त्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले नाही.अतिक्रमण धारकाने प्रशासनाकडुन देण्यात आलेल्या सर्व नोटीसांना केराची टोपली दाखवत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती प्रमाणे

समाजबांधवासमोर आसुरी हास्य दाखवत फिरत आहे.यामुळे समाज बांधवांमध्ये पुन्हा असंतोष पसरत आहे.तर प्रशासनावरील विश्वास उडत चालला आहे. यासाठी प्रशासनाने वेळीच या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ अतिक्रमण हटवुन दफ्तरी नोंद नाही घेतल्यास पुन्हा उपोषणास बसण्यात येईल असा इशारा माळी महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष शरद पेठकर,पंचाप्पा

तुगावे, सिद्रामप्पा तुगावे, दत्ता नारंगवाडे,रामलिंग भुसणे, सोमलिंग माळी,बंडाप्पा तुगावे, गिरीधर चाकुरे यांचेसह समाजबांधवाच्या वतीने निवेदनाद्वारे निलंगा उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी निलंगा यांना देण्यात आला आहे.

Most Popular

To Top