पोलीस

पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनात लातूर LCB ची कौतुकास्पद कामगिरी एका दिवसात 03 गुन्हे उघड करून केली हॅट्रिक

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातील विवीध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषता मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता LCB कडून विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते. पथके माहिती गोळा करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 01/ 05/ 2022 रोजी (LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती

मिळाली की, MIDC पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोटारसायकल घेऊन बाभळगाव चौकात उभा आहे  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ बाबळगाव चौकात पोचून रोडवर मोटरसायकल सह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन  विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुशांत शिवाजी गायकवाड, वय 23 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी लातूर असे असल्याचे

सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटार सायकल संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटार सायकल काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील व पाखरसांगवी परिसरातून चोरी केल्याचे सांगून त्याच्या आणखीन साथीदारांसह लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखीन मोटारसायकली चोरी केल्याचे

सांगितले.त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीचे साथीदार 1) महादेव दिलीप समुखराव, वय 20 वर्ष, राहणार राजीवनगर बाभळगाव रोड लातूर  2)कृष्णा गुंडेराव लोंढे, वय 19 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी, लातूर यांना LCB पथकाने अतिशय  शिताफीने तात्काळ ताब्यात घेऊन त्यांनी लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करून

पोलीस ताब्यातील तिन आरोपीकडून चोरीच्या पाच मोटारसायकली, चोरीचे तीन मोबाईल असा एकूण 02 लाख 72 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मोटार सायकल चोरी चे तीन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. हि कामगिरी (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार संजू भोसले, पोलीस अंमलदार राम गवारे, कोडसुरे,  सिद्धेश्वर जाधव , नाना भोंग , केंद्रे यांनी पार पाडली.

Most Popular

To Top