निटूर ग्रामपंचायतीचा शिंदे डेव्हलपर्स कडून घेतलेल्या साहित्यात भृष्टाचारच, चौकशी अहवालातून नऊ रोड बाॕक्स गायब असल्याचे स्पष्ट..!!

महाराष्ट्र खाकी ( निलंगा ) – जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना निटूर ग्रा. पं. ने पाईप लाईन फुटली व पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या नावाखाली शिंदे डेव्हलपर्स कडून तीन हजार पाचशे फूट पाईप लाईन दहा रोड बाॕक्स व इतर साहीत्य फुकटात घेवून ते न वापरता त्यात अपहार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते धम्मानंद काळे यांनी निलंगा पंचायत

समिती कडे केली होती त्यानंतर गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी दोन अधिकाऱ्यांना संयुक्त चौकशी करण्याच्या सुचना केल्या होत्या त्यामध्ये चौकशी झाल्यानंतर शिंदे डेव्हलपर्सने दिलेल्या साहित्यापैकी नऊ रोड बाँक्स गायब असल्याचे लेखी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी अधिकाऱ्यांने दिला आहे
त्यामध्ये जर नऊ रोड बाँक्स गायब असले तर मग पाईप

लाईन च्या ठिकाणी नऊ वाॕल्व्ह बसवले का ? हे पहाणे महत्वाचे चे आहे कारण वाॕल्व्ह च्या वरच्या ठिकाणी च रोड बाॕक्स बसवले जातात त्यामुळे जर नऊ रोड बाॕक्स गायब असतील तर वाॕल्व्ह चे काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे त्यामुळे या प्रकरणातले गुढ आणखी वाढले असून या प्रकरणात खोलवर जावून गंभीरपणे चौकशी करण्याची गरज आहे .नुकतेच

जहिराबाद लातूर निटूर येथे महामार्गाचे काम झाले आहे काम सुरू झाल्यानंतर मुख्य रस्त्यावर कांही ठिकाणी अवजड वाहनामुळे पाईप लाईन फुटली होती ती कंपनीने दुरूस्त ही करून दिली होती माञ त्या नंतर ग्रा. प. ने. पाईप लाईन फुटली म्हणून साडेतीन हजार फूट पाईप लाईन दहा रोड बाॕक्स सह इतर साहित्य कंपनी कडून घेतले होते माञ त्याचा वापर योग्य ठिकाणी झाला

नसल्याची व या कामात भृष्टाचार झाल्याची तक्रार धम्मानंद काळे यांनी दिली होती त्यावरून पंचायत समिती च्या दोन अधिकाऱ्यां मार्फत चौकशी झाली असता नऊ रोड बाँक्स गायब असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे . दरम्यान चौकशी अहवालात नऊ रोड बाॕक्स गायब असल्याचे सांगितले खरे माञ त्याला जिम्मेदार सेवकाला ठरवण्यात आले आहे त्यामुळे सेवकांनी निलंगा पं स. ला

लेखी पञ देवून आपला यात कसलाही संबध नसल्याचे सांगून दहा रोड बाॕक्स व वाॕल्व्ह सरपंचाने स्वतःच्या स्वाक्षरी ने शिंदे डेव्हलपर्स कडून घेतल्याचे सांगून तसा पुरावाच पं स. कार्यालयाला दिला आहे त्यामुळे दोन महिने चाललेल्या या चौकशी च्या गु-हाळा मध्ये नेमके ठरवून कुणाला तर वाचवण्यासाठी सेवकाला अडकावण्यात आल्याची चर्चा सध्या होत आहे .

सदरील पाईप लाईन भृष्टाचाराच्या चौकशी ला चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांने दोन महिने कालावधी लावला त्यामुळे एवढा उशीर का झाला व वेळेत चौकशी केली नाही म्हणून पं स. विस्तार अधिकारी अंकुश बिराजदार व पाणी पुरवठ्याचे अभियंता कुलकर्णी यांना गटविकास अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती सदरील तपासनी अहवालामध्ये केवळ रोड बाॕक्स गायब

असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे माञ वाॕल्व्ह च्या संदर्भात काहीच उल्लेख करण्यात आला नाही त्यामुळे वाॕल्व्ह च्या ठिकाणी वरच्या बाजूला रोड बाॕक्स बसतात हे चौकशी अधिकाऱ्यांना माहीत नसाव व वाॕल्व्ह बसवल्यावरच रोड बाॕक्स बसतात हे माहीती नासाव हे न उलगडणारे कोडे आहे. सदरील रोडबाँक्स हे सेवकाने बसवले नसल्याचे अहवाल सांगतो आहे माञ ते सर्व नऊ

रोड बाॕक्स सरपंचाने च स्वतःची स्वाक्षरी करून ताब्यात घेतल्याचे पुराव्यासह पञ ग्रा. पं. च्या सेवकाने गटविकास अधिकारी निलंगा यांच्या कडे दिले आहे त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे या प्रकरणात तक्रार कर्त्याचे ही समाधान झाले नसल्याने पाच मे रोजी या प्रकरणाची सुनावनी पं स. निलंगा येथे ठेवण्यात आली आहे .

Recent Posts