महाराष्ट्र

उदगीर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत

महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके ) – ढोल – ताशाचा गजर, सुमधुर वाद्यवृंद, फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी अशा मंगलमय वातावरणात 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचे उदगीर नगरीत स्वागत करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन भारत सासणे यांचे स्वागत

केले. उदगीर रेल्वे स्थानक येथे सकाळी साडेसात वाजता भारत सासणे आणि त्यांच्या पत्नी मीना सासणे यांचे आगमन झाले. संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य समन्वयक दिनेश सास्तुरकर, संमेलन समन्वयक रमेश अंबरखाने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, सुभाष देशपांडे यांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे

स्वागत केले. ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचे स्वागत करताना कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर. समवेत रमेश अंबरखाने, धनंजय गुडसूरकर, दिनेश सास्तुरकर आदी उपस्थित होते.

Most Popular

To Top