आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने किल्लारी येथे उभारणार मराठवाड्यातील पहिले आयुष रुग्णालय 

महाराष्ट्र खाकी ( औसा / प्रशांत साळुंके) – भुकंपग्रस्त किल्लारी (ता.औसा) भागातील नागरिकांना आयुष रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री सर्बानंदा सोनोवाल यांची भेट घेवून किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात आयुष रुग्णालय उभारणीची मागणी केली होती.

या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संबंधित केंद्रीयमंत्री सोनोवाल यांच्याकडे पत्राद्वारे शिफारस केली होती.एकंदरीत आ. अभिमन्यू पवार यांच्या या प्रयत्नाला यश आले असून येथे 30 खाटांचे आयुष रुग्णालयाला हिरवा कंदील दाखविण्यात आला असून यासाठी 9 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने किल्लारी येथे मराठवाड्यातील पहिले आयुष रुग्णालयासाठी मंजूरी मिळाली आहे. 27 जुलै, 2021 रोजी केंद्रीय आयुष तथा बंदरे जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंदा सोनोवाल यांची आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्ली येथे भेट घेऊन किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात 30 बेड्सचे आयुष रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी केली होती.

किल्लारी येथे आयुष रुग्णालयासाठी मुबलक जागा उपलब्ध असून किल्लारी या भूकंपग्रस्त भागास आयुष रुग्णालयाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते.यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केंद्रीयमंत्री सोनोवाल यांना पत्राद्वारे किल्लारी येथील आयुष रुग्णालयासाठी शिफारस केली होती. या सर्व प्रयत्नांना यश आले असून ग्रामीण रुग्णालय, किल्लारी

येथे 30 बेड्सचे प्रशस्त आयुष रुग्णालय उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. आयुष मंत्रालयाने त्यासाठी 9 कोटी रुपयांची तरतुदी केलेली आहे.आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामुग्री, औषधी उद्यान व निवासस्थाने इत्यादींचा सविस्तर कृती आराखडाही सादर करण्यात आला आहे.या आयुष रुग्णालयायाचा फायदा

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ासह मराठवाड्यातील नागरिकांना होणार आहे. मतदारसंघातील आरोग्य सेवा सक्षम असावी यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील आरोग्य केंद्रांना स्थानिक विकास निधीतून 9 तर क्रिएटिव्ह फाऊंडेशन व आ. अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने 6 आशा 15 रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. याचबरोबर कोव्हीड काळात

रुग्णांच्या उपचारासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम आमदार निधी देत औसा, किल्लारी, कासारसिरसी येथील ग्रामीण रुग्णालयात 30 लक्ष रुपये व्हेंटीलेटर खरेदी साठी मंजूर करण्यात आले आहेत व सर्व 9 प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच 3 ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आवशक कॉट व बेड आमदार निधी अंतर्गत उपलब्ध करून दिला होता.

तसेच लातूर जिल्ह्य़ात अत्यंत गंभीर रुग्णांना तातडीने आॅक्सीजन बेड व अतिदक्षता सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या स्थानिक विकास निधीतून लातूर येथे जंम्बो कोव्हीड हाॅस्पिटल व औसा येथे डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयाच्या आवश्यक यंत्र सामुग्री व साहित्य खरेदीसाठी 1 कोटी रुपये दिले होते.

Recent Posts