महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे व माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातील एकमेव 72 फुटी पुतळा स्टॅच्यू ऑफ नॉलेज उभारला जात आहे. या निमित्ताने भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांच्या समवेत लिंगायत समाजातील नागरिकांनी खासदार श्रृंगारे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
सुधाकर श्रृंगारे यांच्या या संकल्पाचे स्वागत करीत यासाठी सहकार्य करण्याचा भावना प्रेरणा होनराव यांनी व्यक्त केली. प्रेरणा होनराव यांनी राजकीय क्षेत्रात खूप कमी काळामध्ये आपल्या कार्य शैली मुळे चांगले नाव आणि आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या वेळी प्रेरणा होनराव यांनी आपले मत वेक्त करतेवेळी म्हणाल्या की जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर व विश्ववंद्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विश्वात्मक आहेत.
त्यांचे कार्य हे अखंड उर्जेचा स्रोत आहे.12 व्या शतकात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी देशाला लोकशाही प्रदान केली. पुरुषांबरोबर स्त्रीयांनाही प्रतिनिधित्व देऊन खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता वास्तावात आणली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही भारताला राज्यघटना देऊन महात्मा बसवेश्वरांना अभिप्रेत असलेली लोकशाही देशाला प्रदान केली.
अशा महापुरुषांची लातूर मध्ये साकारण्यात येत असलेली ही 72 फुटी प्रतिमा ज्ञानाची महती, समतेची व्याख्या अन् मानवतेची महानता सांगणारी आहे. महामानवांच्या स्मारकातूनही सत्कार्यासाठी स्फूर्ती मिळते. ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ च्या निर्मिती मुळे लातूरचे नाव देशभर सन्मानाने अधोरेखित होणार आहे असे मत प्रेरणा होनराव यांनी वेक्त केले
यावेळी नगरसेवक संगीत रंदाळे , शैलेश स्वामी , महेश कौळखेरे , अखिल भारतीय वीरशैव महासभेचे जिल्हाध्यक्ष शेटकार , सचिव भांजी , लिंगायत विकास परिषदेचे सचिन हुरदळे , बसव सेवा संघाचे बालाजी पिंपळे , बसव ब्रिगेडचे बसवेश्वर हेंगणे , लिंगायत समन्वय समितीचे प्रा. राजेश विभुते , सूर्यकांत वाले , महेश अंबुलगे , नितीन मोहनाळे , श्रीनिवास मेनकुदळे , दिनेश लोखंडे , सुनील ताडमाडले आदी उपस्थित होते.