महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – सदगुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसाद्वारे संचालित 225 वा श्री नाथषष्ठी महोत्सव माकणी थोर येथे संपन्न झाला. यावेळी सत्संग, चक्रीभजन, नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या चक्रीभजन सोहळ्यास उपस्थित राहून मारुती मंदिरात दर्शन घेतले. यावेळी लातूर जिल्ह्याला सुख आणि समृद्धी लाभावी अशी प्रार्थना माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.
याप्रसंगी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील परमपुज्य अणू महाराज, विद्याउपासक पवन महाराज, गहिनीनाथ महाराज,दगडूजी सोळुंके, अशोक शिंदे, मधुकर माकणीकर, तानाजी माकणीकर गुरुजी, तम्माजी माडीबोने, लक्ष्मण आकडे, गणेश आकडे, अविनाश येळीकर, माधव सूर्यवंशी,मंदिर समितीचे व नाथषष्ठी महोत्सव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.