महाराष्ट्र खाकी (कोल्हापूर) – करुणा मुंडे यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन करून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आता या पक्षाकडून करुणा मुंडे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकिती अधिकृत उमेदवार असणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील
श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करुणा मुंडे पोहोचल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं आणि धनंजय मुंडेंचा उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले.
करुणा मुंडे यांनी यावेळी म्हटलं की, “जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. कोल्हापुरातील घराणेशाहीचं राजकारण आपण संपवणार आहोत. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे”. देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू असल्याचं करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. “धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या”, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी यावेळी केला.
करुणा मुंडे यांनी
पुढे म्हटलं की, “त्यामुळे धनंजय मुंडेंना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही असे करुणा मुंडे म्हणाल्या.