महाराष्ट्र

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 23 मार्चला वाशिम – पुसद मार्गावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे ई-लोकार्पण

महाराष्ट्र खाकी ( वाशिम ) – वाशिम – पुसद मार्गावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे ई – लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज

देसाई हे असतील.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री डॉ. रणजीत पाटील,ऍड. किरणराव सरनाईक, वसंत खंडेलवाल,लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा

परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यमार्ग केंद्रीय मार्ग निधीतून या उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. 18 कोटी 36 लाख रुपये या पुलाच्या बांधकामावर खर्च करण्यात आला आहे.

सन 2021- 22 या वर्षामध्ये 1 कोटी 96 लक्ष रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित कामासाठी 2 कोटी 12 लक्ष रुपये निधी यासाठी लागणार आहे. प्रवाशांना व नागरिकांना या पुलामुळे मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Most Popular

To Top