महाराष्ट्र

लातूर शहराच्या विविध विकासकामांकरिता 22 कोटी 58 लक्ष निधीस प्रशासकीय मान्यता

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर मनपा स्थापना झाल्यापासून मनपा काँग्रेसच्या ताब्यात आहे. मधल्या काळात भाजपाची सत्ता होती पण त्या काळात म्हणावा तसा लातूर शहरासाठी विकास निधी मिळाला नाही हे लातूरची जनता जाणून आहे. परत लातूर मनपावर विक्रांत गोजमगुंडे यांच्या मुळे काँग्रेसच्या ताब्यात आली आणि राज्यात ही महाविकास आघाडी सरकार आले. आणि लातूरचा विकास होण्यास सुरुवात झाली या विकास कामासाठी लातूर मनपाचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रयत्न करत असतात

आणि आता लातूर शहरातील सर्वच प्रभागातील विविध विकास कामांकरिता 22 कोटी 58 लक्ष निधीस मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरच्या जनतेच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत . या विकासकामासाठी महानगरपालिकेच्या वतीने लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामे हाती घेतली जाणार आहेत. कोरोना संकटामुळे प्रलंबित राहिलेली विकासकामे आता मार्गी लागत आहेत. यातून लातूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिपादन केले आहे.

कोणत्या कामासाठी किती निधी मिळाला
लातूर लहाराच्या मूलभूत सोयी सुविधा योजना 7 कोटी,
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना 15 कोटी 16 लक्ष आणि दलित्तेतर वस्ती सुधार योजना 42 लक्ष

 

Most Popular

To Top