महाराष्ट्र खाकी ( परळी वैजनाथ ) – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही जाहीर निषेध केला आहे.
केंद्र सरकार ED च्या आडून जाणिवपूर्वक द्वेषाचे राजकारण करत आहे हे निषेधार्ह असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे. बुधवारी (23 फेब्रुवारी) ED ने नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.या अटकेच्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्व ठिकाणी निषेध केला जात आहे.
परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या कारवाईचा तिव्र निषेध करण्यात आला आहे. भाजपचे केंद्रातील सरकार जाणिवपूर्वक अशा प्रकारच्या द्वेषाचे राजकारण करत आहे. सत्तेचा गैरवापर करून ED सारख्या संस्थाचा वापर लोकशाहीला घातक आहे.जाणिवपूर्वक द्वेषाचे राजकारण करत आहे हे निषेधार्ह असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.