महाराष्ट्र

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी लातूर मध्ये भाजपा कडून आंदोलन आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाने मनिलॉंड्रीगं प्रकरणी ED कडे आठ दिवसाची कस्टडी दिली. याबबद्दल पूर्ण महाराष्ट्रात भाजपा कडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन होत आहेत.

लातूर मध्येही जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड, गुरुनाथ मगे, भाजप युवा मोर्चा च्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांच्या मार्गदर्शनात तातडीने नवाब मालिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रेरणा होनराव यांनी आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले प्रेरणा होनराव यावेळी बोलताना म्हणाल्या की या सरकार मधील एक मंत्री म्हणजे माजी गृहमंत्री 100 कोटी वसुली च्या आरोपात जेल मध्ये आहे.

आणि आता हे दुसरे मंत्री नवाब मलिक यांना ED ने अटक केली असून मालिकांचे कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना मदत करण्यासारखे आहे. ज्या दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले, वेळोवेळी विघातक कृत्यांना चालना दिली त्या व्यक्तीशी कुठलेही आर्थिक व्यवहार म्हणजे देशद्रोह असून अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही.

Most Popular

To Top