महाराष्ट्र

नवाब मालिकांच्या समर्थनात आणि भाजपच्या दडपशाही विरुद्ध लातूर काँग्रेस तर्फे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत ED मार्फत अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने राज्य भरात आंदोलने होत आहेत.

असेच आंदोलन आज (25 फेब्रुवारी) रोजी लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या दडपशाहीविरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या. सोबत राष्टवादीचे पधादिकारी आणि कार्यकर्ते होते. या आंदोलनात लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीतील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी,

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, लातूर जिल्हा व शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल, ओ.बी.सी. सेल, व्हीजेएनटी विभाग, एनएसयूआय, सोशल मिडिया, इंटक, विधी विभाग, विलासराव देशमुख युवा मंच आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या पदाधिकार्‍यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

Most Popular

To Top