देश

लातूरचे सुपुत्र केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलेल्या कार्याचे पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

महाराष्ट्र खाकी (मुंबई) – भारतात असे अनेक राजकारणी, नेते, मंत्री आहेत की आपले प्रोफेशन आणि राजकारण करत असतात आणि कधी कुठे एखादी अडचण अलीतर आपल्या प्रोफेशन चा उपयोग करून लोकांची मदत करतात. अशीच एक घटना घडली आहे. दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानातील प्रवाशाची तब्येत अचानक बिघडते विमानातील क्रू मेंबर्सकडून उद्घोषणा कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती हे ऐकताच एक डॉक्टर त्या तबियत बिघडलेल्या

प्रवाशाजवळ जाऊन त्या प्रवाशाला प्रथमोपचार देतात त्या प्रवाशाचा जीव वाचविणारे ते डॉक्टर होते महाराष्ट्रातील लातूरचे सुपुत्र केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी परिस्तिथीचे गांभीर्य ओळखून मदत केली आणि माणुसकीचे दर्शन घडवले डॉ. भागवत कराड यांच्या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करूनडॉ. भागवत कराड यांचं कौतुक केलं आहे .केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. डॉ. भागवत कराड लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चिखली गावचे आहेत. डॉ. कराड यांच्या कार्याचे कौतुक लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनीही केले आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6 E 171 या विमानातून प्रवास करत होते. यावेळी अचानकडॉ. भागवत कराड यांच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. तेव्हा केबिन क्रूने प्लाइटमध्ये कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती केली. हे ऐकताच डॉक्टर भागवत कराड जे स्वतः व्यवसायाने डॉक्टर आणि सर्जन आहेत, ते मदतीसाठी धावून आले. डॉ. भागवत कराड यांनी प्रवाशाला प्रथमोपचार दिले आणि फ्लाइटमध्ये उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी किटमधून प्रवाशाला
इंजेक्शनही दिले.

Most Popular

To Top