नॅशनल क्रिडा स्पर्धा-2021 मध्ये लातूर पोलिसांची उत्तम कामगिरी

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील क्राईम रेट कमी तर झाला आहेच, पण आता लातूर पोलिसांची क्रीडा क्षेत्रात ही उत्तम कामगिरी दिसून येत आहे. “नॅशनल क्रीडा स्पर्धा-2021” नाशिक येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये लातूर जिल्हा पोलिस खेळाडूंनी दैदिप्यमान यश मिळवले आहे. 02 सुवर्ण, 01सिल्वर व 04 ब्राँझ पदक मिळवून लातूर पोलीस दलाचा अभिमान आणि सन्मान वाढवला आहे.

यश संपादन करणारे पोलीस खेळाडू
हॉलीबॉल- सुवर्णपदक
1) ए.आर.स्वामी,2) ए.बी.कोकरे,3) जे.एच.शेख,
4) टी.ए.सवई,5) पी.व्ही.स्वामी,6) आर.व्ही.शिंदे
7) व्ही.बी.पवार,8) बी.व्हि.हंरगुळे

अँथेलेटीक्स
1) भालाफेक -ब्रांझ पदक – ए.आर .स्वामी
2) लाबंउडी – ब्रांझ पदक — ए.आर.स्वामी
3) गोळाफेक – सिल्वर मेडल -जे.एच.शेख
4) थाळीफेक – ब्रांझ मेडल – जे.एच.शेख
5) 110 मी.एर्डल्स्‌ -ब्रांझ पदक – पी.व्ही.स्वामी

या सर्व पोलीस खेळाडूंचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल लातूर पोलीस दलाचे आणि खेळाडूंचे वेगवेगळ्या क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे