लातूरकरांच्या सेवेत मराठवाड्यातील सर्वात अद्यावत अग्निशमन वाहन

महाराष्ट्र खाकी (लातूर) – “जे जे नव ते लातूरला हव” या वाक्यानुसार लातूर शहरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे खरे उतरत आहेत. कारण महापौरांचा नेटका कारभार सर्व लातूरकरांना याची चांगलीच अनुभूती दिसून येत आहे. मागील दोन वर्षात विक्रांत गिजमगुंडे यांनी लातूर शहराचा विकास केला आहे आणि करत ही आहेत. जे मनपा कडून होऊ शकते ते ते करतात नाहीत पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कडून उपलब्ध करून घेत असतात. काही दिवसापूर्वीच मनपाने कचरा संकलन करण्याची मशीन सेवेत आणली आहे आणि आता अग्निशमन सेवा हि मनपाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. लातूरकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लातूर शहर मनपाने मराठवाड्यातील सर्वात आधुनिक व अद्यावत अग्निशमन वाहन लातूरकरांच्या सेवेत उपलब्ध केले आहे. अनेक मजली इमारतीला लागलेली आग अतिशय जलद गतीने विजविण्याची क्षमता असलेले तसेच आणीबाणीच्या प्रसंगी बचावात्मक कामातही उपयोगी ठरणारे हे वाहन जिल्हा नियोजन समिती द्वारा उपलब्ध करण्यात आलेल्या निधी मधून खरेदी करण्यात आले आहे. अग्निशमन, आपत्कालीन परिस्थिती मध्ये लातूर शहर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग कायमच अग्रेसर कामगिरी बजावत आला आहे. आता या आधुनिक वाहनाच्या मदतीने अग्निशमन विभाग अधिक बळकट झाला आहे असे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी वेक्त केले आहे. अद्यावत अग्निशमन वाहनांचा लवकरच पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम होईल आणि लातूरकरांच्या सेवेत रुजू होत आहे.

Recent Posts