महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – आमदारांचा स्थानिक विकास निधी 2 कोटींवरुन 3 कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी 1 कोटींची भरघोस वाढ केली आहे, त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी 4 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांच्यातसुध्दा आनंदाचे वातावरण असून दसऱ्याच्या पूर्वसंध्येला त्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्यासह देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासदारांचा विकास निधी गोठवला आहे. त्यामुळे स्थानिक विकास कामांसाठी खासदारांच्याकडे कोणताही निधी उपलब्ध नाही. तर राज्यातल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 कोटीची वाढ करुन तो 3 कोटी करण्याची घोषणा सभागृहात केली होती, तसेच भविष्यात या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी वाढ करण्याचा शब्द दिला होता. हा शब्द पाळताना अजितदादांनी आमदारांचा विकास निधी चार कोटी रुपये केला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेच्या विकासांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विधानसभेतील 288 आणि विधान परिषदेतील 62 अशा एकूण 350 आमदारांना 350 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व आमदारांना मिळून आता प्रत्येक वर्षी एकूण 1400 कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळणार आहे. राज्याच्या इतिहासातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतील वाढीची आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्याचबरोबर आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून, प्रत्येकी एक कोटीचा निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास आमदारांना परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची वाढ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला
- Maharashtra Khaki
- October 16, 2021
- 12:38 pm
Recent Posts
IIB NEWS दशरथ पाटील यांच्या IIB च्या अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आणि प्रीमिअम कॅम्पस चे उद्घाटन
January 11, 2025
No Comments
क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून निलंग्यातील तरुणाने संपवले जीवन
January 9, 2025
No Comments
Latur Jilha जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी घेतला तंबाखू नियंत्रण समितीच्या कामाचा आढावा
January 7, 2025
No Comments
भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी मा. नेहरू देशमुख यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या
December 31, 2024
No Comments