कोरोना काळात उत्तम कार्य केल्या बद्दल डॉ. भराटे आणि डॉ. जटाळ यांचा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र खाकी (लातूर) – कोरोनाच्या कठीण काळात लोकांना आधार होता तो म्हणजे डॉक्टर मंडळींचा, त्यांनी आपले कर्तव्य पार पडल्यामुळे कोरोनाची लढाई सोपी झाली. लातूर शहरातील नामांकित डॉ. रमेश भराटे आणि डॉ. S. M जटाळ यांचा कोरोना काळात उत्तम कामगिरी केल्यामुळे आणि लातूरकरांच्या कोरोणाच्या लढाईत खंबीर साथ दिली म्हणून यांचा कोरोना योद्धा म्हणून महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लातूर शहरातील लातूर शहरातील अंबाजोगाई रोड लगत नूरमोहमद बहादूर शेख यांच्या डायमंड बेकरी व उमर पटेल यांच्या बालकुंदेकर मेडिकल दुकानाचा शुभारंभ लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाला. लातूर शहरात उद्योग व्यवसाय वृद्धी साठी पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे त्यामुळेच येथे दररोज नवनवीन दालनांची सुरुवात होत असल्याचे यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, सुनील पडिले, सिकंदर पटेल, सईद चाऊस, आरिफ शेख, डॉ. S.M जटाळ डॉ. रमेश भराटे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Recent Posts