महाराष्ट्र

अन्नत्याग आंदोलनात अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वात युवा शक्तीचे दर्शन

महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्रात अतीवृष्टी मुळे काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे त्या भागातील शेतीचे खूप मोठे नुकसान झाले, हाताशी आलेले पिक गेले. विशेषता मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तीच परिस्तिथी लातूर जिल्ह्यात वेगळी नव्हती. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष आणि आमदार रमेश अप्पा कराड यांच्या नेतृत्वात 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते काल ते पूर्ण झाले त्याचा फायदा ही झाला. या आंदोलनाच्या निमित्ताने लातूर भाजपा मधील युवा शक्ती मोठ्या प्रमानात दिसून आली त्यात प्रमुख वाटा होता तो भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि लातूर मनपा सदस्य अजित पाटील कव्हेकर यांचा कारण अजित पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनात अनेक सक्रीय सहभाग दिसून आला अजित पाटील हे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे राजकीय वारसदार आहेत.

शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी 1995 साली विधानसभेला विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता. लातूरच्या राजकारणात कव्हेकर परिवाराचे मोठे योगदान आहे आणि तेच कार्य अजित पाटील करत आहेत. या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून अजित पाटील चांगलेच चर्चेत आहेत. अजित पाटील यांनी लातूर शहरात अनेक उपक्रम आणि आंदोलने केले आहेत. अजित पाटील यांच्या कार्याला आणि विचारांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे हे या आंदोलनाच्या निमित्ताने दिसून आला. येणाऱ्या मनपा निवडणुकीत याचा फायदा भाजपला नक्की होणार असे दिसून येत आहे आणि जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे. अजित पाटील यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत आपले समाजसेवा आणि राजकारण करत आहेत. लातूर शहरात अमित देशमुखांना पर्याय कोण असेल तर ते अजित पाटील आहेत असे बऱ्याच जणांना वाटत !

Most Popular

To Top