महाराष्ट्र

ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे . अनेक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदत मिळण्याची मागणी केली होती . शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने NDRF च्या निकषांची वाट न पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे . महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी आणि पुरामुळे 55 लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले होते .

महाराष्ट्र सरकारची मदत अशा प्रकारे असेल

जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्‍टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्‍टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्‍टर
ही आर्थिक मदत 2 हेक्‍टर मर्यादेत करण्यात येईल

“अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट
भरत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी,” असे राजू शेट्टी म्हणाले होते. तसेच लातूर मध्ये शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात 72 तासाचे अन्नत्याग आंदोलनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि लातूर मधील औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि तुळजापूरचे आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी 16 तारखेला पद यात्रा काढण्याचे ठरवले होते पण आता ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहिर केले आहे तर ही पद यात्रा काढणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Most Popular

To Top