महाराष्ट्र खाकी (उस्मानाबाद) – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या प्रत्येक कामाला प्राधान्य देऊन काम करण्याचा प्रयत्न करत असतात.अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.अती पावसामुळे नदीला मोठा पूर आला आहे. सास्तूर व राजेगाव येथे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. महसूल, कृषी विभाग व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदी होत नसतील तर तलाठी अथवा कृषी सहाय्यकाकडे लेखी अर्ज करून पोचपावती घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. राजेगाव येथील बारेज जवळील रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना अंदाजपत्रक सादर करण्याच्या आणि सास्तूर- गुबाळ रस्त्यावरील पुलाचे काम मागील 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. नदीला पाणी आले तर रस्त्याची वाहतुक पूर्णपणे बंद होते. अर्थात यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या अनुषंगाने संबंधित कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांना मार्च अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याच्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सूचना दिल्या. तुळजापूर तालुक्यात शेतरस्ताची कामे मोठया प्रमाणात सुरू असून लोहारा तालुक्यात देखील नोव्हेंबर नंतर शेतस्त्याची कामे सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहनही केले. याप्रसंगी तहसीलदार, गटविकास अधिकारी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

