लातूर जिल्हा

पालकमंत्री अमित देशमुखांनी निलंगा तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी केले

महाराष्ट्र खाकी (निलंगा) – मराठवाड्यात पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात रेणापूर, औसा निलंगा या तालुक्यातील प्रामुख्याने परिस्थिती बिकट आहे. लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी पूर परिस्थितीचा अंदाज येताच जिल्ह्यात दाखल झाले आणि लातूरच्या जनतेला मदत आणि धीर देत आहेत. आणि प्रशासनाला वेळोवेळी निर्देशही देत आहेत. पालकमंत्री अमित देशमुख आज निलंगा तालुक्यातील गौर गौरी येथे आज सकाळी वरिष्ठ अधिकारी सहकार्‍यांसह जाऊन,अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, ग्रामस्थ, शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना दिलासा दिला. अपघातग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याच्या परिभाषेत बसणारे हे अभूतपूर्व संकट असल्यामुळे शासन त्या दृष्टीने निश्चितपणे विचार करील अशी ग्वाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.नदीकाठच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या दृष्टीने विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी असे निर्देश याप्रसंगी पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यावेळीअशोकराव पाटील निलंगेकर,काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अभय साळुंके, जिल्हा परिषद CO अभिनव गोयल आणि नागरिक आदी उपस्थित होते.

Most Popular

To Top