लातूर जिल्ह्यात गुटखा माफिया चांगलाच सक्रीय, अन्न आणि औषध विभाग झोपेत ?

महाराष्ट्र खाकी (लातूर) – गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे ही फॅशन होऊ लागली आहे. मात्र या पदार्थांमुळे कर्करोग आणि अन्य गंभीर स्वरूपाचे आजार होतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने 2012 पासून सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली. सुरुवातीच्या काळात याबाबत औषध व पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली; मात्र पुन्हा त्याकडे दुर्लक्ष केले गेले. लातूर जिल्ह्यात ही काही अशीच परिस्थिती दिसून येत आहे मागील काही काळात औषध आणि पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभारत कडक कारवाई करण्यात आली होती पण काही दिवसातच गुटखाविक्री खुलेआम चालू झाली आहे असे दिसून येत आहे. पुन्हा लातूर जिल्ह्यात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची जोरदार विक्री सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या शहरांसह पानटपऱ्या, आणि छोट्या किराणा दुकानांमधून त्यांची विक्री होत आहे.लातूर,उदगीर, अहमदपूर, निलंगा, देवणी, आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ग्रामीण भागांत गुटखा
आणि तंबाखूजन्य पदार्थांची गोदामे आहेत! या पदार्थांची चोरट्या मार्गाने वाहतूक आणि विक्री सुरू आहे. तरुण पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या या बेकायदा व्यवसायाला आळा घालण्यात अन्न आणि औषध लातूर प्रशासनाला अपयश आल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे आता यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांनी लक्ष घालावे लागेल अशी जिल्ह्यातून मागणी होत आहे.

जिल्ह्यात खुलेआमपणे विक्री होत आहे.

लातूर येथील गोलाई बाजारपेठ, उदगीर , शिरूर अनंतपाळ , देवणी , अहमदपूर शहर, निलंगा , अशा वेगवेगळ्या ठिकाणी किराणा दुकान , पानटपऱ्यांद्वारे गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री राजरोसपणे सुरू आहे, हे ‘ महाराष्ट्र खाकी न्यूज ‘च्या पाहणीत दिसून आले.

किराणा दुकाने आणि पानटपऱ्या विक्रीची हॉटस्पॉट

उदगीर , अहमदपूर , लातूर या तीन तालुक्‍यांत गुटखा साठवण्याची अनेक गोदामे आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. गुटखामाफिया हे रात्री अथवा पहाटेच्या वेळी मागणीनुसार कार, टेम्पो आणि दुचाकीच्या माध्यमातून गुटखा इच्छित स्थळी पोहचवतात. त्यासाठी ठिकठिकाणी गुटखाविक्री, वाहतूक करणाऱ्या व्यक्ती कार्यरत आहेत. गल्लीतील किराणा दुकाने आणि पान टपऱ्या तर या पदार्थाच्या विक्रीची मुख्य ठिकाणे झाली आहेत.

Recent Posts