लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा कारभार जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेवस्तीत चालू आहे. लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. सभासदांच्या गुणवंत पाल्याचे कौतुक करणारे कार्यक्रमासोबत सभासदांचा 10 लाखाचा अपघात विमा उतरविण्यात आला आहे. 20 कोटी रूपये भागभांडवल असलेल्या या पतसंस्थेने आपल्या व्याज दारात 1% ची कमी केली आहे.13% वरील व्याज दर 12% केला आहे. पतसंस्था संगणकीकृत करण्यात आली आहे. 1400 सभासद असलेल्या या पतसंस्थेत सभासद वर्गणी 500 रूपयावरून 1000 करण्यात आली आहे. कर्ज मर्यादा तीन लाखावरून पाच लाख करण्यात आली आहे, पतसंस्थेस या वर्षी 1.33 कोटीचा फायदा झाला असून पतसंस्था लवकरच स्वतःची जागा घेऊन इमारत बांधणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन श्रीमंत मोरे यांनी दिली. लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षीक सर्वसाधारण सभा रविवार दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी भाग्यश्री फंक्शन हॉल, वसंतराव नाईक चौक, रिंग रोड, लातूर येथे सकाळी 11 वाजता आयोजीत करण्यात आली होती. विद्याधर टेकाळे, बाळासाहेब कन्हेरे, आयुब शेख यांच्या नेतृत्वात व्हाईस चेअरमन संजय कांबळे, सचिव अहेमदमिया खान, राजकुमार गुळभिले, गोविंद राठोड, प्रल्हाद केंद्रे, सुग्रीव देशमुख, नवनाथ कल्याणे, किशोर मंगलगिरे, लता वाघमारे, कल्पना जाधव या संचालकांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या सहकार्याने पारदर्शक कारभार
करून सभासदांचे हित जोपासण्याचा आमचा प्रयत्न
असल्याचा चेअस्मन श्रीमंत मोरे यांनी निर्धार केला आहे.

Recent Posts