औसा तालुक्यातील तुंगी गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती बलात्काराची घटना

महाराष्ट्र खाकी ( औसा ) – महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार करू अत्याचाराचा घटना घडल्या आहेत. विरोधी पक्षाकडून सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्तित केले गेले. मग त्या चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि लातूर मधून प्रेरणा होनराव यांनी तीव्र नेषेध वेक्त करत आपले मत वेक्त केले. हे सर्व शांत होत नाही तोपर्यंत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तुंगी गावातील 31 वर्षीय वेक्तीने स्वतःच्या घरा शोजारी राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला . ही अल्पवयीन पीडित मुलगी 3 महिन्यांची गरोदर राहिली असून तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून गर्भपात करण्यात आला आहे. आवश्‍यक नमुने रासायनिक तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवले असून महिला तक्रार निवारण केंद्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली गीते यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करीत आहेत या घटनेवर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची प्रतिक्रिया आली नाही!

Recent Posts