महाराष्ट्र खाकी (औसा ) – भरतीय जनता पार्टीत प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि नरेंद्र मोदीं यांच्याबद्द आदर आहे. बरेच जण तर त्यांना आदर्श मानतात त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतात. पंडित दीनदयाळ उपाध्यय यांच्या जयंती निमित्त आणि नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विवीध सामाजिक उपक्रम राबवतात असाच एक उपक्रम लातूर जिल्ह्यातील औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या नेत्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पद्मभूषण डॉ अशोकराव कुकडे आणि माजी आमदार पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत औसा मतदार संघात 6 रुग्णवाहीकांचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.या 6 रुग्णवाहीकापैकी आमदार अभिमन्यू पवार यांच्या स्थानिक विकास निधीतून 3 रुग्णवाहिका औसा, किल्लारी व कासार सिरसी ग्रामीण रुग्णालयांना सुपूर्द करण्यात आल्या तर क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या 3 रुग्णवाहिका उजनी, कासार बालकुंदा व औसा येथून फाऊंडेशनमार्फतच ना नफा ना तोटा तत्वावर चालविल्या जाणार आहेत.
या 6 रुग्णवाहिकांनी संपूर्ण मतदारसंघतील नागरिकांना मदत होईल . या कार्यक्रमासाठी आमदार अभिमन्यू पवार यांचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस यांनी व्यस्त वेळापत्रकातून या सोहळ्यासाठी वेळ काढून ऑनलाईन उपस्थित राहिले. उपस्थितांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवार यांनी आपल्या औसा मतदारसंघातील कामांचा उहापोह करून दिलेली कौतुकाची थाप मारली.
या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एच व्ही वडगावे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान केंद्राचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख, पदाधिकारी, मतदारसंघातील भारतीय BJP चे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व ग्रामीण रुग्णालय/प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व मतदार संघातील नागरिक उपस्तित होते.