Pune,कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या वेबसाइटचे उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

महाराष्ट्र खाकी (पुणे) – पुणे जिल्ह्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या 124 व्या वर्षाचे निमित्त साधून मंदिराच्या वेबसाइटचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनामुळे गणेशोत्सव, दत्तजयंती साजरी करण्यावर मर्यादा आल्या आहेत . आपल्याला यापुढे देखील जीवनशैली बदलावी लागणार आहे. भविष्यात मंदिरात प्रत्येक प्रसंगी आपल्याला उपस्थित राहता येईलच, असे नाही. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने ऑनलाइन सुविधांवर भर ठेवणे योग्य राहणार आहे असे गृहमंत्री म्हणाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुढे असे म्हणालेकी 35-36 वर्षांपासून माझा दगडूशेठ गणपती व दत्तमंदिर या देवस्थानांशी संबंध आहे. दगडूशेठचे गणपती बाप्पा आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी काम करत आलो आहे. धार्मिक कामासोबतच सामाजिक बांधिलकी स्वीकारून देवस्थानाच्या वतीने मदत केली जाते. कोविडच्या काळात दोन वर्षे पोलीस रस्त्यावर उतरून काम करत आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे अनेक पोलीस तणावाखाली आहेत, त्यांच्या या कामासाठी समाज पोलिसांप्रती कृतज्ञ आहे, हे ट्रस्टने केलेल्या मदतीतून दिसून येते.

यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अ‍ॅड. रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते.

Recent Posts