पोलीस

लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 228 पोलीस अंमलदारांना पदोन्नती दिली

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून IPS निखिल पिंगळे यांनी सूत्र हातात घेतल्यापासून लातूर पोलिसांची काम करण्याची पद्धत बदलली आहे आणि लोकांना दिसून ही येत आहे. लातूर पोलिस दलात 23 पोलिस स्टेशन,109 पोलिस अधिकारी 1838 पोलिस कर्मचारी आहेत. आणि वेगवेगळी पथके आहेत. या सर्वांची कामगिरी कौतुकास्पद आहे. म्हणून आणि बऱ्याच कालावधीपासून लातूर पोलीस अमलदारांची पदोन्नती प्रलंबित होती. महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी लातूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 228 पोलीस अंमलदारांना पदोन्नती दिली आहे. यामध्ये 44 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 77 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती तर 107 पोलीस शोपाई यांना पोलीस नाईक पदोन्नती देण्यात आली आहे.पदोन्नतीतील आरक्षणा बाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे बऱ्याच कालावधीपासून या पदोन्नत रखडल्या होत्या.
शासन निर्णयाप्रमाणे पोलीस अधीक्षक यांनी पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या तब्बल 228 पोलीस अमलदारांना पदोन्नतीचे आदेश दिले आहेत . त्यामुळे लातूर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदोन्नती झालेल्या सर्व अमलदारांचे अभिनंदन केले.आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Most Popular

To Top