महाराष्ट्र खाकी (मुंबई) – लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लोदगा येथे फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने बांबूपासून अनेक उपयुक्त वस्तुंची निर्मिती करण्यात येत आहे. खुर्ची, स्पीकर अॅम्प्लिफायर, गणपतीची मूर्ती अशा अनेक वस्तु तयार करण्यात येत आहेत. माजी आमदार पाशा पटेल हे फडणवीस सरकार मध्ये राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होते. पाशा पटेल यांनी औसा तालुक्यातील लोदगा येथे बांबू लागवड करून बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू तयार करत आहेत. आणि बांबू लागवड क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत.
पाशा पटेल यांनी आपल्या फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून बांबू पासून बनवलेल्या वस्तू केंद्रीय मंत्री नितीन गडकरीना भेट वस्तू दिल्या होत्या त्याच प्रमाणे पाशा पटेल यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या वस्तु दाखविल्या आणि भेट म्हणून एक बांबू पासून बनवलेला गणपती आणि खुर्ची भेट दिली. या बद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की बांबूच्या वस्तुंना चालना देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यातून ग्रामोद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. मला आनंद आहे की, यादृष्टीने पाशा पटेल यांच्या फिनिक्स फाऊंडेशन कडून पुढाकार घेतला जात आहे.