देश

प्रेरणा होनराव यांनी राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चा तथा खासदार तेजस्वी सूर्या यांची बंगळूरू येथे भेट घेतली.

महाराष्ट्र खाकी ( बंगळूरू ) – भारतीय जनता युवा मोर्चाने भाजपाला आणि भाजपने देशाला खूप अभ्यासू आणि मोठे नेते दिले आहेत. याचाच वारसा महाराष्ट्रात प्रदेश सचिव असलेल्या प्रेरणा होनराव या कार्य करत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यानी युवकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्याचे सतत प्रयत्न करत आहेत. आणि प्रेरणा होनराव या महाराष्ट्रात प्रसार माध्यमासमोर भारतीय जनता पार्टीची बाजू जिम्मेदारीने आणि अभ्यासपूर्ण बाजू मांडत असतात. प्रेरणा होनराव यांनी वेळोवेळी मोठ्या नेत्यांच्या भेटी घेऊन आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेत असतात अशीच एक भेट प्रेरणा होनराव यांनी घेतली आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व दक्षिण बंगळूरूचे खासदार तेजस्वी सूर्याजी यांची बंगळूरू येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. नावाप्रमाणेच अत्यंत तेजस्वी, ऊर्जावन असलेले तेजस्वी सूर्याजी एक अभ्यासू खासदार आहेत. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन देशभरातील तरुणांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सूर्याजी करत आहेत. प्रेरणा होनराव असे मत व्यक्त केले आहे आणि त्यांच्याशी युवा व शैक्षणिक विषयावर चर्चा केली.

Most Popular

To Top